Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कुरवेल येथे दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

चोपडा प्रतिनिधी । तालुक्यातील कुरवेल येथील विद्यालयात नुकताच दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे चेअरमन व्ही. बी. पाटील हे होते

शाळा संपून आता कॉलेजमधील शिक्षण सुरू होणार याची चाहूल लागते ती शाळेतल्या या निरोप समारंभात. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या आठवणींना जसा उजाळा मिळतो, तसे पुढील करिअरसाठी बेस्ट लक हे शब्द पाठबळ देऊन जातात. या अनुषंगाने कुरवेल हायस्कूल येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे चेअरमन व्ही. बी. पाटील हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून शालेय समितीचे सदस्य काशिनाथ भोजू चौधरी, के. जी. चौधरी, चोपडा येथील कन्या माध्यमिक विद्यालयाचचे शिक्षक व्ही पी चौधरी हे उपस्थीत होते.

प्रस्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक ए .एम. पाटील यांनी केले. त्यांनी आतापर्यंतची विद्यालयाची यशस्वी वाटचाल भविष्यातील योजना विषयी माहिती दिली.चोपडा येथील कन्या माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व्ही .पी. चौधरी यांनी समाजासाठी एक चांगला नागरिक निर्माण करण्याचे काम या विद्यालयाने केले आहे.भविष्यात आई वडिलांची स्वप्न पूर्ण करा.समाजाच्या उपयोगात आपल्याला कसे उपयोगात येता येईल तसेच पेपर सोडवताना वेळेचे नियोजन कसे करावे विज्ञान व गणित या विषयांची भीती न बाळगता त्यांना सोप्या पद्धतीने लिहण्याची पध्दतीविषयी त्यांनी सांगितले. ए .व्ही. पाटील यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी विद्यालयातील आठवणींना उजाळा दिला.सूत्रसंचलन जी आर पाटील यांनी केले. व्ही. बी. पाटील यांनी आभार मानले. सूत्रसंचलन जी. आर. पाटील यांनी केले. यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Exit mobile version