Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कुपन प्रणालीमुळे दिव्यांग प्रमाणपत्र कार्यवाही झाली सुलभ

जळगाव, प्रतिनिधी  । येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात बुधवारी १८ ऑगस्ट रोजी दिव्यांग प्रमाणपत्र मिळण्याबाबतचे कामकाज झाले. दिव्यांग बांधवांची दर बुधवारी होणारी गर्दी आणि गैरसोय पाहता दिव्यांग मंडळाने सुरु केलेल्या आगाऊ बुकिंग कुपन प्रणालीला चांगला प्रतिसाद लाभला आहे.

 

येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात बुधवार दि. २८ जुलै २०२१ पासून दिव्यांग मंडळ अद्ययावत सुविधांसह कार्यान्वित झाले आहे. दिव्यांग मंडळ अंतर्गत दिव्यांग व्यक्तींना दर बुधवारी प्रमाणपत्र मिळण्याबाबतची कार्यवाही सुरु झाली. ज्या  दिव्यांग बांधवानी १८ ऑगस्टचे कुपन घेतले होते अशा २०० दिव्यांगांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून वैद्यकीय तपासणी सकाळी ९ ते १ वाजेदरम्यान करण्यात आली. तपासणी मुख्य गेट नं. २  कडील  अधिष्ठाता कार्यालयासमोरील दिव्यांग मंडळाच्या कार्यालयात तसेच ओपीडी कक्षात झाली. नेहमी दिसणारी गर्दी हि मर्यादित झाली.दरम्यान, आता सप्टेंबर महिन्यातील पाचही बुधवारची कुपन संपली असून  शुक्रवारी २० ऑगस्टपासून बुधवार दि. ६ ऑक्टोबरचे कुपन कार्यालयीन वेळेत वितरित करण्यात येणार आहे. डोळ्यांनी दिव्यांग बांधवांना तपासणी नेत्रकक्षात करण्यात आली. पूर्वी डोळ्यात ड्रॉप टाकण्यासाठी बसावे लागे. आता खाटा उपलब्ध झाल्याने नेत्रकक्षात रुग्णांना झोपण्याचीदेखील व्यवस्था झाली. उपअधिष्ठाता तथा दिव्यांग मंडळाचे अध्यक्ष डॉ. मारुती पोटे, मंडळाचे सचिव तथा वैद्यकीय अधीक्षक डॉ. संगीता गावित यांच्यासह तज्ज्ञ  डॉ. योगेश गांगुर्डे, डॉ. योगेंद्र नेहेते, डॉ. दिलीप महाजन, डॉ. विनोद पवार, डॉ.प्रसन्ना पाटील, डॉ. गिरीश राणे, डॉ. नेहा भंगाळे यांनी दिव्यांगांची तपासणी केली. कर्मचारी  चेतन निकम, दत्तात्रय पवार, अनिल निकाळजे, विशाल दळवी, आरती दुसाने, वाल्मिक घुले, विकास राजपूत, प्रकाश पाटील, अजय जाधव, विश्वजीत चौधरी यांनी सहकार्य केले.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी नियोजनाचे कौतुक करतांना सांगितले की,  सकाळी दिव्यांग बांधवांची नेहमी होणारी गर्दी दिसली नाही. कुपन प्रणालीमुळे ज्यांना आजची १८ रोजीची तारीख मिळाली होती, त्यांनी कुपन दाखवून तपासणी केली. कुपन प्रणाली यशस्वीरीत्या राबविली गेली, तसेच योग्य व्यवस्थापन केले म्हणून मंडळाच्या कार्यकारिणीसह कर्मचाऱ्यांचे कौतुक आहे.

Exit mobile version