Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कुंभारवाडा मेहरूण येथून तरूण बेपत्ता

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  शहरातील कुंभारवाडा मेहरूण येथून २४ वर्षीय तरुण बाहेरगावी फिरण्यासाठी जात असल्याचे सांगून बेपत्ता झाला आहे. याबाबत शनिवार २९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.राहुल बापू गव्हाळे (वय-२४) रा. कुंभारवाडा मेहरूण, जळगाव असे बेपत्ता झालेल्या तरुणाचे नाव आहे.

 

अधिक माहिती अशी की, राहुल गव्हाळे  हा आपल्या कुटुंबीयांसह  वास्तव्याला आहे. खाजगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतो. शुक्रवार २८ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता बाहेरगावी फिरण्यासाठी जातो असे सांगून घरातून गेला. परंतु अद्यापपर्यंत घरी आला नाही. त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला परंतु तो कुठेही मिळून आला नाही. अखेर शनिवार २९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता त्याचे वडील बापू सीताराम गव्हाळे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन खबर दिली. त्यांच्या खबरीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.  याबाबत पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय धनगर करीत आहे.

Exit mobile version