किलबिल शाळेत रंगली अभ्यासजत्रा

जळगाव लाईव्ह टट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । केसीइ सोसायटी संचलित किलबिल बालक मंदिरात अभ्यासजत्रा भरली होती.

या कार्यक्रमांमध्ये गुरुवर्य परशुराम विठोबा पाटील शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा पाटील या प्रमुख पाहुण्या होत्या. विशेष गोष्ट म्हणजे भुसावळच्या श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळाच्या मुक्ताई शिशु मंदिराच्या सहाय्यक शिक्षिका या खास अभ्यासजत्रा अनुभवण्यासाठी आलेल्या होत्या. २१ टेबलांवर मांडलेल्या शैक्षणिक साधनांसह ५ ते ६ वयोगटातील सुमारे १५० मुलं आत्मविश्वासाने पालकांशी समन्वयक मुलांशी संवाद साधत होती. शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका अर्चना नेमाडे यांनी सर्वांचे स्वागत केले तसेच रत्ना नेमाडे यांनी सूत्रसंचालन केले.

शालेय समन्वयक चंद्रकांत भंडारी यांनी शाळेत होणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती सर्व पालकांना शिक्षकांना करून दिले. गेल्या १० वर्षांपासून भरणाऱ्या या अभ्यासजत्रेला पालकांसह शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांची तसेच शाळेतील मनीषा आमोदकर, प्रतिभा जोशी, तृप्ती अटळे, शालिनी चौधरी, कुंदा भारंबे, स्मिता पाटील यांच्यासह आदी उपस्थित होते.

Protected Content