Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

किराणा दुकान फोडणाऱ्या संशयित आरोपीला अटक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील शिवाजीनगर येथील किराणा दुकान फोडून ९० हजारांची रोकड लांबविल्याच्या प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात तब्बल ४ महिन्यांपासून फरार असलेल्या संशयिताला रविवार, १६ सप्टेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. फिरोज नुर मोहमंद शहा वय २० रा. गेंदाला मिल असे अटकेतील संशयिताचे नाव आहे.

जळगाव शहरातील शिवाजी नगर येथे आनंद मदनलाल नागला यांचे किराणा दुकान आहे.या किराणा दुकानात चोरट्यांनी शटर उचकावून दुकानातील गल्ल्याच्या ड्रॉव्हर मधून ९० हजार रुपयांची रोकड चोरुन नेल्याची घटना २ जुलै २०२२ रोजी उघडकीस आली होती. याप्रकरणी शहर पोलस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

शिवाजीनगरातील किराणा दुकानात चोरी ही गेंदालाल मिल येथील फिरोज शहा याने केल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक किसन नजनपाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पोलीस हेडकॉन्स्टेबल जितेंद्र पाटील, अक्रम शेख, महेश महाजन, नितीन बाविस्कर, अविनाश देवरे, ईश्वर पाटील यांच्या पथकाला फिरोज यास अटक करण्याच्या सुचना केल्या होत्या. चार महिन्यांपासून फरार असलेला फिरोज हा रविवारी रेल्वे स्टेशन परिसरात आला असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने रेल्वे स्टेशन मागील परिसरातून पूलाखालून फिरोज यास अटक केली. त्याला पुढील कारवाई करीता शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Exit mobile version