Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

किरकोळ कारणावरून विवाहितेचा छळ

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील जुने भगवान नगर परिसरात राहणाऱ्या विवाहितेला किरकोळ कारणावरून मारहाण व शिवीगाळ करत शारीरिक व मानसिक छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळीं विरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरात माहेर असलेल्या सायली योगेश शिंदे (वय-२६)यांचा विवाह जळगाव शहरातील जुने भगवान नगर परिसरात राहणारे योगेश विश्वासराव शिंदे यांच्याशी रितीरिवाजानुसार झाला. लग्नाचे सुरुवातीचे दिवस गेल्यानंतर किरकोळ कारणावरून पती योगेश शिंदे याने पत्नीला मारहाण व शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच महिलेला जीवेठार मारण्याची देखील धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर पीडित विवाहिता माहेरी निघून आल्या. त्यानंतर रविवारी ११ जून रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार पती योगेश विश्वासराव शिंदे, सासु कल्पना विश्वासराव शिंदे, सासरे विश्वासराव हरचंद्र शिंदे, ननंद कविता अविनाश पाटील आणि मीनल दत्तात्रय पाटील यांच्या विरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक कालसिंग बारेला करीत आहे.

Exit mobile version