Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

किरकोळ कारणावरून दोन गटात फ्री-स्टाईल हाणामारी

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील सांगवी खुर्द येथे किरकोळ कारणावरून दोन गटात फ्री स्टाईल हाणामारी झाल्याची घटना घडली. या घटनेप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात परस्परविरोधात १८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

या घटनेत पहिल्या फिर्यादीत सुनिल रामदास कोळी (वय-४८) रा. सांगवी खुर्द ता. यावल यांनी म्हटले आहे की, त्यांचा मुलगा लखन कोळी हा १५ एप्रिल रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास मुंजोबाच्या कार्यक्रम सांगण्यासाठी जात असतांना गल्लीतील जुन्या भांडणात मारहाण केल्याच्या कारणावरून संजय वसंत धनगर यांच्यासह आठ जणांनी लखन कोळी याला मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी शनिवार १६ एप्रिल रोजी रात्री सुनिल कोळी यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी शुभम प्रमोद धनगर, निलेश संजय धनगर, संदीप संजय धनगर, गणेश मधुकर धनगर, संजय वसंत धनगर, कैलास वसंत धनगर, प्रमोद वसंत धनगर आणि बबलु कैलास धनगर सर्व रा. सांगवी खुर्द ता. यावल यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर दुसऱ्या गटातील संजय वसंत धनगर (वय-५५) रा. सांगवी खुर्द ता.यावल यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शुक्रवार १५ एप्रिल रोजी त्यांचा भाचा गणेश मधुकर ठोके याला शिवीगाळ करत असल्याचा जाब विचारला. याचा राग आल्याने लखन सुनिल कोळी, सुनिल रामदास कोळी यांच्यासह इतर १० जणांनी लाठ्या काठ्यांनी गणेश ठोके आणि संजय धनगर यांना बेदम मारहाण केली. याप्रकरणी संजय धनगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी लखन सुनिल कोळी, सुनिल रामदास कोळी, सागर सुनिल कोळी, चंद्रकांत दिलीप कोळी, दिलीप पितांबर कोळी, ताराचंद दिलीप कोळी, भागवत दिनकर कोळी, रविंद्र पोपट कोळी, विकास गणेश कोळी आणि महेंद्र भगवान कोळी सर्व रा. सांगवी ता. यावल यांच्या विरोधात यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक संदीप सुर्यवंशी करीत आहे.

Exit mobile version