Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

किरकोळ कारणावरून दांपत्याला दारूच्या नशेत एकाकडून मारहाण.

जामनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्युज ।  तालुक्यातील सामरोद येथे किरकोळ कारणावरून दाम्पत्याला एकाने दारूच्या नशेत येऊन शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात शुक्रवारी 24 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजता एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, प्रकाश माधव कांबळे (वय-३६, रा. सामरोद ता. जामनेर) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. दरम्यान गावातील सुरेश भुरा सोनवणे त्या ठिकाणी राहतात. दरम्यान प्रकाश कांबळे व त्यांची पत्नी असे दोघेजण नातेवाईकांच्या लग्नासाठी गेले होते. दरम्यान लग्नात सुरेश सोनवणे यांची पत्नी देखील गेली होती. आपल्या पत्नीचे कान भरणी करत असल्याची संशयावरून सुरेश सोनवणे याने प्रकाश कांबळे व त्यांच्या पत्नी यांना शिवीगाळ करून मारहाण केली. या मारहाणीत प्रकाश कांबळे जखमी झाले. त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान पोलिसांना दिलेल्या प्रकाश कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुरेश भुरा सोनवणे रा. सामरोद ता. जामनेर यांच्या विरोधात जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोहेकॉ रियाज शेख करीत आहे.

Exit mobile version