Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

किरकोळ कारणावरून तांबापूऱ्यात तरूणावर मारहाण; शहर पोलीसात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । शहरातील तांबापुरा शिरसोली नाका येथील वेल्डींग दुकानदार लहान मुलांनी पेटवलेल्या शेकोटीवर हात शेकत असतांना वाद होवून जगदीश सिंग बावरी, सोनू बावरी, मोहनसींग बावरी अशा तिघांनी भजनसींग व त्याचा भाऊ प्रकाशसींग बावरी अशांना मारहाण केली. मारहाणीत दोघांचे डोके फोडल्या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांतसा गुन्ह्याची नोंद करण्यात आली. जखमीवर जिल्‍हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

पोलिसांत दाखल तक्रारीनुसार भजनसींग मितसींग बावरी (वय-३६) याच्या घरासमोरच लहान मुलांनी पेटवलेल्या शेकोटीवर हात शेकत बसला होता. यावेळी जगदीशसींग बावरी तेथे आला. येथे शेकोटी का पेटवली म्हणुन त्याने वाद घातला. लहान मुलांना शिवीगाळ करतोय म्हणुन हटकले असता जगदीशसींग याने प्रकाशसींग मितरसींग बावरी यांना शिवीगाळ करत हातातील लोखंडी कडे डोक्यात मारले, त्याचा भाऊ मोहनसींग याने भजनसींग याच्या डोक्यात वीट मारुन जखमी केले. परीसरातील रहिवाश्यांनी भांडण सोडवुन जखमींना जिल्‍हा रूग्णालयात हलवले. जखमी भजनसींगच्या तक्रारीवरुन एमआयडीसी पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

Exit mobile version