Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

किरकोळ कारणावरून तरूणासह पत्नी व मित्राला बेदम मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । घराकडे का पाहतो याचा जाब विचारल्याच्या कारणावरून तरूणाला त्यांच्या पत्नीसह मित्रांला बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना कंडारी शिवारातील परेश रिसोर्ट नजीक घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, राहूल सतिष तायडे (वय-३०) रा. चिंचोली ता. यावल ह.मु. परेश रिसॉर्ट कंडारी ता.जि.जळगाव हा तरूण आपल्या पत्नीसह वास्तव्याला आहे. शनिवार १ जुलै रोजी सायंकाळी ८ वाजेच्या सुमारास राहूल तायडे  परेश रिसॉर्ट नजीकच्या घरी असतांना काही जण त्यांच्या घराकडे बघत होते. याचा जाब विचारल्याच्या कारणावरून वरून कृष्णा भालेराव, दिपक सोनवणे, शेखर भालेराव आणि अनोळखी व्यक्ती सर्व रा. कसुंबा ता. जि.जळगाव या चौघांनी राहूल तायडे, व त्यांची पत्नी आणि मित्र प्रदीप सोनवणे या तिघांना लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून गंभीर जखमी करून तिघांना जीवेठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर राहूल तायडे याने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार रविवार २ जुलै रोजी मध्यरात्री १ वाजता राहूल तायडे याने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी कृष्णा भालेराव, दिपक सोनवणे, शेखर भालेराव आणि अनोळखी व्यक्ती सर्व रा. कसुंबा ता. जि.जळगाव यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ रविंद्र तायडे करीत आहे.

Exit mobile version