Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

किन्होळा येथील तरूणाचा गळफास घेवून आत्महत्या

धामनगाव बढे प्रतिनिधी । येथील ३५ वर्षीय तरूणाने राहत्या घरात रूमालाच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीला आली. याप्रकरणी पोलीसात नोंद घेण्यात आली.

याबाबत माहिती अशी की, उमेश सुकदेव अहिरे (वय-३५) रा. किन्होळा ता. मोताळा जि. बुलढाणा या तरूणाने आज ८ एप्रिल रोजी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास राहत्या घरात कोणीही नसतांना रूमालाच्या मदतीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना उघडकीला आली. बुलढाणा रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. याप्रकरणी धामनगाव बढे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अशिष गद्रे हे करीत आहे. 

 

Exit mobile version