Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

किनगाव येथील पशुवैद्यकिय चिकित्सालयात अधिकारी नसल्याने शेतकऱ्यांचे हाल

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील किनगाव येथील पशुवैद्यकिय चिकित्सालयात पशूवैद्यकिय अधिकारी नसल्यामुळे तालुक्यातील शेतकरी कमालीचे हैराण झाले आहे. पशुला वेळेवर उपचार मिळत नसल्यामुळे १७ गावांना याचा फटका बसला आहे. 

 किनगाव गावाच्या परिसरात आदीवासी १७ गावांचा संपर्क या गावांशी असुन, या दृष्टीकोणातुन जिल्हा परीषदेने येथे भव्य असे प्रथमश्रेणी पशुवैद्यकिय दावाखाना उभारला आहे. मात्र या दवाखाण्यात गेल्या २ महीण्यांपासून येथे गुरांना आरोग्यसेवा देण्यासाठी पशुधन अधिकारी  नसल्यामुळे परीसरातील गुरांना उपचार मिळत नाही म्हणून परीसरातील शेतकरी कमालीचे हैराण झाले आहेत किनगाव येथे प्रथमश्रेणी पशुवैद्यकिय दवाखाना असल्यामुळे किनगावला लागुन असलेले चिंचोली, आडगाव, मालोद, नायगाव, कासारखेडे, मनापुरी, गिरडगाव, डोणगाव आणी वाघोदा या गावांच्या गुरांना आरोग्य सेवा देण्यासाठी हा प्रथमश्रेणी दवाखाना सुरू करण्यात आला आहे. मात्र येथे पशुवैद्यकिय अधीकारीच नसल्याने परीसरातील शेतकरी बांधवांकडुन प्रशासनाच्या कारभाराविषयी तिव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त करीत आहेत.

 

शासनाने येथे कायमस्वरूपी पशुवैद्यकिय अधीकारी दिले नाहीत म्हणून येथे प्रभारी पशुवैद्यकिय अधीकारी आहेत व त्यांना किनगावच्या पशुवैद्यकिय दवाखाण्यात पुर्णवेळ देता येत नाही. परीसरातील गुरांचे आरोग्य धोक्यात आले आहे.  परीसरातील गुरांवर लाळखुरगटीचा आजार आहे. मात्र उपचारा अभावी गुरांचा जिव धोक्यात आला आहे तसेच शासनाच्या वेळापत्रकानुसार हा दवाखाना फेब्रूवारी ते सप्टेबर या कालावधीत सकाळी ७ ते १२ व दुपारी ४ ते ६ अशी वेळ आहे तर ऑक्टोबर ते जानेवारी या कालावधीत दवाखाण्याची वेळ सकाळी ८ ते १२ व सायंकाळी ३ ते ५ वाजेपर्यंत अशी वेळ असतांना मात्र हा दवाखाना नेहमी बंदच असतो म्हणून गुरांचे आरोग्य अधीक धोक्यात आले आहे तरी वरीष्ठ आधीकारी यांनी या विषयाची गंभीर दखल घेऊन किनगाव पशुवैद्यकिय दावाखाण्यात तात्काळ  कायमस्वरूपी पशुवैद्यकिय आधीकारी नियुक्त करावा व परीसरातील गुरांच्या आरोग्याशी होत असलेला हा खेड थांबवावा अशी मागणी परीसरातील शेतकरी करीत आहेत.

Exit mobile version