Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

किनगाव येथील खेळाडूंची राज्यस्तरीय किक बॉक्सींग स्पर्धेसाठी निवड

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील किनगाव येथील इंग्लीश मेडियम निवासी स्कुलच्या आदीवासी विद्यार्थीनी व विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धसाठी निवड करण्यात आली आहे.

नंदुरबार येथे मागील आठवड्यात पार पडलेल्या विभागिय स्तर किक्बॉक्सिंग स्पर्धेत इंग्लिश मेडियम निवासी पब्लिक स्कूल किनगाव शाळेच्या आदीवासी विद्यार्थी सविन बारेला व रोशन बारेला यांनी प्रथम क्रमांक मिळवला. यात १४ वर्षा आतील ३२ किलो वजनगटात सविन सुरेश बारेला तर १७ वर्षा आतील ४५ किलो वजनगटात रोशन रमेश बारेला यांनी प्रथम क्रमांक पटकवला. या दोनही खेळाडुंची राज्यस्तरीय स्पर्धे साठी निवड झाली असून आता ते राज्यपातळी वरील स्पर्धा खेळणार आहेत. तसेच मुलींनमध्ये अश्विनी शिवाजी बारेला १४ वर्षा आतिल २४ किलो वजनगटात तर माना सतरसिंग बारेला हिने ३१ किलो वजनगटात द्वितीय क्रमांक पटकवला.

या सर्व क्रिडा स्पर्धत लक्ष वेधणारे यश संपादन करणार्‍या खेळाळुंना कोच तुषार जाधव व क्रिडाशिक्षक दिलीप बिहारी संगेले यांचे बहुमुल्य मार्गदर्शन लाभले. विजयी सर्व खेळाडुंचे किनगाव इंग्लिश मेडीयम निवासी पब्लिक स्कूलचे चेअरमन विजयकुमार देवचंद पाटील, सचिव मनिष पाटील, व्यवस्थापक सौ.पुनम मनिष पाटील, प्राचार्य अशोक प्रतापसिंग पाटील, उप प्राचार्य सौ.राजश्री सुभाष अहिरराव व शिक्षक आणी शिक्षकेतर कर्मचारी यांनी स्वागत करीत विद्यार्थ्याना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात.

Exit mobile version