Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे हिवताप जनजागृती मोहीम

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत नुकतेच हिवताप दिना निमिताने हिवताप मोहीम राबविण्यात आली..

याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ.मनिषा महाजन, द्वितीय वैद्यकीय अधिकारी तरन्नुम शेख व तालुका पर्यवेक्षक विजय नेमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक आरोग्य केंद्र किनगाव अंतर्गत उपकेंद्र आडगाव येथे हिवताप मोहीम राबवण्यात आली. या कार्येक्रमाचे सूत्रसंचालन आरोग्यसेवक पवन काळे (पाटील) यांनी केले. या मोहिमेमध्ये गावात जलताप रुग्ण सर्वेक्षण, कंटेनर सर्वेक्षण,हस्त पत्रिका वाटणे इत्यादी आरोग्य संदर्भातील जनजागृती मोहीम राबविण्यात आली. गाव पातळीवर हिवतापाची लक्षणे उपचार हिवताप प्रतिरोधक उपाययोजनांनबद्दल माहिती नागरिकांना देण्यात आली.

नागरिकांनी आपापल्या घरातील पाणीसाठे झाकून ठेवणे, घरासमोरील नाल्या वाहत्या करणे, खिडक्यांना जाड्या बसवणे, शौचालयाच्या व्हेंट पाईपला जाडी बसवणे, घरासमोर पाणी साचू न देणे, आठवड्यातुन एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळणे, अशा सूचना यावेळी नागरिकांना देण्यात आल्या. या मोहिमेमध्ये आडगाव चे सरपंच, सदस्य, शिक्षक, आरोग्य सेवक व आरोग्यसेविका इतर नागरीक या ठीकाणी उपस्थित होते. तसेच मनापुरी गावामध्ये आरोग्य सेविका शिलाजमरा यांनी ग्रामस्थांना हिवतापाबाबत मोलाचे मार्गदर्शन केले तर किनगाव प्राथमिक आरोग्य केंन्द्रा अंतर्गत येणाऱ्या मालोद, नायगाव, चिंचोली उपकेंद्रासह किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये हिवताप जनजागृती मोहीम राबविण्यात आली यामध्ये आरोग्य सहाय्यीका श्रीमती उषा पाटील, कविता सपकाळे आरोग्य सहाय्यक राजेश सुरवाडे आरोग्यसेविका मोहिनी धांडे,सुजाता सोनवणे व आशा वर्कर यांनी सहभाग घेतला होता.

Exit mobile version