Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

किनगाव घरफोडी : एक लाख ३५ हजाराचे दागीने , ठेवीच्या पावत्या लंपास

यावल : प्रतिनिधी। किनगाव गावात काल रात्री अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कलुप तोडुन सोन्याचांदीच्या दागीन्यासह पाच लाख रुपयांच्या ठेवीच्या पावत्या घेवुन पोबारा केला नागरीकांमध्ये भितीचे वातावरण असून, यावल पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

किनगाव येथील डिंगबर पाटील (वय ७०, सेवानिवृत्त वायरमन) ५ ऑक्टोबररोजी पुणे येथे मुलगा देवानंद पाटील आणी नितिन पाटील यांच्या भेटीस सहकुटुंब गेले कोरोना संसर्गामुळे त्यांना पुण्याहुन लवकर येणे शक्य झाले नाही १० ऑक्टोबररोजी रात्री त्यांचे शेजारी पद्दमाकर ढाके यांनी फोन करून तुमच्या घरात चोरी झाली असल्याची माहीती दिली ,

डिगंबर पाटील यांनी माहीती मिळताच तात्काळ किनगाव गाठले यावल पोलीसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की घरातील कपाटातीत लॉकरमधील प्रत्येकी पाच ग्रॅम सोन्याच्या चार अंगठया , ३७ हजार रुपये किमतीची सोन्याची पोत सोबत पदक , १२ हजार ५०० रुपये किमतीची सोन्याची लहान मुलाची चैन, २५ हजार रुपये किमत असलेली मनी पोत, ४ लाख रुपयांच्या स्टेट बँकेतील मुदत ठेवीच्या पावत्या व जेडीसीसी बॅकेच्या १ लाख ६ हजार रुपये किमतीच्या मुदत ठेवीच्या पावत्या असा ऐवज आणी ६ हजार रुपये रोख चोरांनी चोरून नेले आहेत ,

यावलचे पोलीस निरिक्षक अरुण धनवडे यांनी या निवासस्थानी भेट देवुन सविस्तर चौकशी व पंचनामा केला पोलिसात गु .र .न .१६३ / २० भादवी कलम४५४, ४५७ , ३८०प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला जळगावहुन श्वानपथक पाचारणा करण्यात आले घरफोडीच्या स्थळापासुन १०० मिटरपर्यंतच्या किनगाव चौफुलीच्या अंतरापर्यंत येवुन श्वान घुटमळला मात्र या परिसरात सिसिटीव्ही कॅमेरे नसल्याने या घरफोडीचा तपास लावण्यास पोलीसांचा कस लागणार आहे .

Exit mobile version