Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

किनगाव इंग्लिश मेडीयम स्कूलमध्ये पालक सभा

यावल, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील दोनगाव येथील किनगाव मार्गावरील इंग्लिश मेडीयम निवासी पब्लिक स्कूलने आयोजित केलेली  विद्यार्थी पालक सभा उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाली.

 

दोनगाव तालुका यावल येथील इंग्लीश स्कुलच्या सभागृहात आयोजित पालक सभा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माध्यमीक विद्यालयाचे प्राचार्य संजय उधोजीसर हे होते, तर प्रमुख उपस्थितीत स्कुलचे सचिव व स्व.केतनदादा मल्टीपर्पज फाऊंडेशनचे अध्यक्ष मनिष विजयकुमार पाटील व प्राथमिक विद्यालयाचे प्राचार्य अशोक पाटील सर तसेच लिड एज्युकेशनचे गौरव बडगुजर मंचावर उपस्थित होते. यावेळी प्राचार्य अशोक पाटील सर यांनी पालकांना मार्गदर्शन करत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यासोबत त्यांनी कोरोना संसर्गाच्या काळात शिक्षणाचे झालेले फायदे व नुकसान याबाबत सांगत १२ एप्रीलपासून शाळेला सुट्या लागतील मात्र कार्यालयीन कार्ये सुरू राहील व शाळेच्या वेळात आपण कार्यालयात आपल्या कामासाठी येऊ शकतात. दि.१ मे रोजी परीक्षेचा निकाल राहील व दि.१३ जुन पासून शाळा सुरू होतील व शाळेत लिड आभ्यासक्रमाला सुरूवात होईल असेही प्रा.अशोक पाटील यांनी स्पष्ट केले.

येत्या शैक्षणीक वर्षापासून स्कुलमध्ये लिड एज्युकेशन शिक्षण प्रणाली सुरू करण्यात येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर पालक सभा बोलावण्यात आली होती. शिक्षण क्षेत्रात होत असलेल्या अत्याधुनीक बदलाबरोबरच आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांनाही अद्यावत शिक्षणाची संधी मिळावी यासाठी इंग्लिश मेडीयम निवासी पब्लिक स्कुलने येत्या शैक्षणीक वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक  विकासासाठी लिड एज्युकेशन प्रणाली सुरू करण्याचा निर्णय घेतला असून परीसरात लिड प्रणाली सुरू करणारी किनगाव येथील इंग्लिश मेडीयम निवासी पब्लिक स्कुल ही पहिलीच शाळा आहे.
यावेळी लिड स्कुलमध्ये के अकांऊंट मँनेजर म्हणून कार्यरत असलेले गौरव बडगुजर यांनी लिड अभ्यासक्रमाबाबत पालकांना माहीती दिली. यावेळी स्कुलचे शिक्षक रोहिणी उधोजी, दिनकर पाटील, अरविंद सोनकुसरे, शाहरुख खान, रश्मी शेख, मिलिंद भालेराव,गोपाल चित्ते, दिलीप संगेले, राजश्री अहिरराव, संपत पावरा, हर्षल मोरे, सुहास भालेराव, वैशाली धांडे, भारती साठे, पवन महाजन, अनिल बारेला, सुनील चौधरी, भावना चोपडे, देवयानी साळुंखे, प्रतिभा धनगर, तुषार धांडे, नेहा धांडे, योगीता बिहारी, बाळासाहेब पाटील आदींसह मोठ्यासंख्येने पालक उपस्थीत होते.सुत्रसंचालन सुहास भालेराव सर यांनी तर आभार पवन महाजन यांनी मानले.

Exit mobile version