Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

किनगावात उद्यापासून श्रीमद भागवत कथा व संकिर्तन सप्ताहाचे आयोजन

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील किनगाव खुर्द येथील श्री दत्तात्रेय भगवान मंदिराच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त प.पू.१००८ आचार्य राकेश प्रसाद महाराज यांच्या आशीर्वादाने व प्रेम प्रकाशदास महाराज संस्थापक स.सु.कोठारी यांच्या प्रेरणेने दि.१ डिसेंबरपासून संगीतमय श्रीमद् भागवत कथा व अखंड हरीनाम संकीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

किनगाव तालुका यावल खंडेराव मंदिरा समोर, इचखेडा मार्गावरील रस्त्यावरील, बाळू दादांच्या वाड्यात किनगाव खुर्द येथे होणा-या या कार्यक्रमाची दिनचर्या खालील प्रमाणे –
पहाटे ५ ते ६ काकडा सायंकाळी ६ ते ७ हरिपाठ रात्री ८:३० ते १०:३० हरी किर्तन होणार आहे तर संगितमय श्रीमद भागवत कथा वाचन सकाळी ८:३० ते ११:३० व दुपारी २:३० ते ५:३० पर्यंत या वेळात होणार आहे तसेच श्री दत्त जयंती महाराज्यभिषेक दि.७ रोजी पहाटे ५:३० वाजता तर पोथी यात्रा दि.१ रोजी सकाळी ७:४५ वाजता बाळू दादांच्या घरापासून निघणार आहे.

तसेच भागवत कथा संतविभूती स.गु.शास्री सरजुदासजी हे वाचन करणार आहेत तर दि.१ रोजी ह.भ.प.विजय महाराज खवले, मुक्ताईनगर दि.२ रोजी ह.भ.प.विनोद सम्राट नाना महाराज दोंडाईचा दि.३ रोजी ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज मेहुणकर दि.४ रोजी ह.भ.प.मनोज महाराज ऐनगावकर दि.५ रोजी ह.भ.प.श्रीराम महाराज उंटावदकर दि. ६ रोजी सुदर्शन महाराज वरठाण दि.७ रोजी ह.भ.प.कैलास महाराज टेकवाडेकर तर दि.८ रोजी धनराज महाराज अंजाळेकर यांचे काल्याचे किर्तन होणार आहे तसेच दि.१ रोजी सकाळी ९:३० वाजता पोथी यात्रा दि.२ रोजी सायंकाळी ५ वा.शांतीदूत श्रीकृष्ण दि.३ रोजी सायंकाळी ४ वा. श्री दत्तजन्म दि.४ रोजी सायंकाळी ५ वा. श्रीकृष्ण जन्म दि.५ रोजी सायंकाळी ५ वा. श्री दर्धामंथन व गोपाळकाला दि.६ रोजी सायंकाळी ५ वा.रूक्मिणी विवाह दि.७ रोजी सकाळी ११ वा.सुदामा चरीत्र व दुपारी १२ वाजता कथा समाप्ती तर सायंकाळी ५ वाजता पोथी दिंडी यात्रा होणार असुन दि.८ रोजी सकाळी ११ वा.महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे या संकिर्तन सप्ताह दरम्यान गायणाचार्य म्हणून ह.भ.प.उमेश महाराज कळमोदकर व ह.भ.प.निलेश महाराज गहुखेडा तर मृदुंगाचार्य म्हणून ह.भ.प.सुदाम महाराज देवगावकर व ह.भ.प.प्रकाश महाराज किनगाव यांची सेवा लाभणार असुन परीसरातील गावांच्या भजनी मंडळींचेही सहकार्य लाभणार असुन सर्व भावीकांनी या संगीतमय श्रीमद् भागवत कथा व संकीर्तन सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

 

Exit mobile version