Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

काही लोकांना हिंदूंची अ‍ॅलर्जी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अयोध्योतून टिका

अयोध्या-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । काही लोकांना हिंदूंची ॲलर्जी आहेत. राणा दाम्पत्याला तरूंगात टाकणारे राम की रावण असा सवाल करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अयोध्येतून विरोधकांवर जोरदार टिका केली आहे.

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कालपासून अयोध्या दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप आणि शिवसेनेच्या मंत्री, आमदार आणि खासदारांनी आज राम मंदिरात प्रभू रामाची महाआरती केली. त्यानंतर या नेत्यांनी राम मंदिराच्या बांधकामाची पाहणी केली. नंतर हनुमान गढी येथे जाऊन हनुमानाचं दर्शन घेतले. यावेळी त्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. हा संवाद साधत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता हल्ला चढवला.

 

भाजपचे खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शाल, श्रीफळ आणि भव्य गदा देऊन त्यांचं स्वागत केलं. यावेळी जय श्रीरामच्या घोषणा देण्यात आल्या. याप्रसंगी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्यासह शिवसेना आणि भाजपचे मंत्री, आमदार आणि खासदार उपस्थित होते. यावेळी छोटेखानी भाषणही झाले. देवेंद्र फडणवीस यांनी जनतेशी संवाद साधून ते निघून गेले. फडणवीस यांना पक्षाच्या कामानिमित्त दिल्लीला जायचे होते. त्यामुळे ते तातडीने निघाले. त्यानंतर शिंदे यांनी जनतेशी संवाद साधला.

Exit mobile version