Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

काहीही झाल तरी कॉग्रेस सोडणार नाही ; आ शिरीष चौधरी

रावेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | काहीही झाल तरी मी कॉग्रेस सोडुन भाजपामध्ये जाणार नाही अशा निर्धार आ. शिरीष चौधरी यांनी व्यक्त केला. ते  दिवाळी पाडव्यानिमित्त रावेर व यावल तालुक्यातील कॉग्रेस पदाधिका-यांची खिरोदा येथे त्यांच्या निवासस्थानी घेण्यात आलेल्या बैठकीत बोलत होते.

 

आमदार शिरीष चौधरी यांनी बैठकीत भूमिका मांडतांना सांगितले की,  माझ्या बद्दल अफवा पसरवल्या जाताय. भाजपावाले जास्तीत-जास्त काय करतील मला त्रास देण्याचा प्रर्यत्न करतील पण मी या सर्व गोष्टीला घाबरत नाही. भाजपाची चलती जास्त काळ राहणार नाही. येत्या काही दिवसात रस्त्यावर उतरून सर्व-साधारण जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी लढा देणार.  यावेळी श्री. चौधरी यांनी पदाधिकारी यांना मार्गदर्शन करतांना भाजपावर सडकुन टिका केली. राष्ट्रवादीचा माझा अपघाती काळ सोडला तर माझ्या तिन पिढ्यां पासुन आम्ही कॉग्रेसमध्ये आहे. भाजपामध्ये जात असल्याची माझ्या बद्दल अफवा पसरवून मतदारसंघात संभ्रम निर्माण केले जात आहे. काहीही झाल तरी मी कॉग्रेस पक्ष सोडणार नाही.  सर्वसाधारण जनता महागाई, बेरोजगारीमुळे त्रस्त आहे. तर इकडे राज्य सरकार जिल्हा परिषद शाळा बंद पाडण्याचा घाट घातला आहे. यामुळे गरीबांचे मुले शिक्षणापासून वंचित राहतील याला भाजपाच जबाबदार राहणार असल्याची टिका आमदार चौधरी यांनी केली. यावेळी त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांवर टिका केली.  या बैठकीला कॉग्रेस धनंजय चौधरी आर. के. पाटील  तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन. गोपाळ नेमाडे, डी. सी. पाटील, सुनिल कोंडे, दिलरुबाब तडवी, डॉ. राजेंद्र पाटील, योगेश गजरे, महेंद्र पवार, विलास ताठे यांच्यासह कॉग्रेस पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते.

 

Exit mobile version