Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कासोद्यात संचारबंदीचे उल्लंघन करणार्‍या दुकानदारांवर गुन्हे दाखल

FIR

कासोदा ता.एरंडोल प्रतिनिधी । येथे अत्यावश्यक सेवा वगळता दोन व्यावसायिकांनी आपली दुकाने सुरू ठेवल्याने त्यांच्या विरोधात पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सरकारने सरकारने दवाखाने, रुग्णालये, मेडिकल दुकान, किराणा दुकान, भाजीपाला व दूध विक्री आदी अत्यावश्यक सेवा वगळून इतर प्रकारच्या विक्रेत्यांना बंदी घातली आहे. यामागे गर्दी टळून संसर्ग पसरणार नाही, असा उद्देश आहे. तरीही या दुकानदारांनी आदेशाचे पालन केले नाही. त्यात पोलिसांनी दि.२४ मार्च मंगळवार रोजी गावातील सैय्यदवाडा परिसरात संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास पेट्रोलिंग करीत असतांना दिलशान अली जाहीर अली सैय्यद (वय ३० वर्षे रा.बिजलीशाह चौक कासोदा) हा जलगाव मावा कुल्फी नावाचा बोर्ड असलेली लोटगाडीवर जिलेबी बनवुन विक्री करीत असतांना मिळून आला. तर येथील मेनरोड परिसरात पावणेसातच्या सुमारास अमोल राजेंद्र भोई (वय ३० वर्षे रा.भोई गल्ली कासोदा) हा साई फूल भांडार नावाचा बोर्ड असलेल्या टेबलवर शेव मुरमुरे ,शेंगदाणे विक्री करतांना मिळून आला. यामुळे दोघांवर स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये भांदवी कलम १८८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई स.पो.नि.रवींद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना.युवराज कोळी, पो.ना.शरद राजपूत पो.कॉ. इम्रान खान यांनी केली.

लाईव्ह ट्रेंडस न्यूजवरील सर्व बातम्या व व्हिडीओ एकाच ठिकाणी पाहण्यासाठी येथे क्लिक करून आपण आमचे पेज फॉलो करू शकतात.

Exit mobile version