Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कासोद्यात उद्यापासून तीन दिवसांचा स्वयंस्फुर्त बंद

कासोदा, ता. एरंडोल प्रतिनिधी । कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून कासोदा गावात दिनांक १ ते ३ मे दरम्यान स्वयंस्फुर्तीने कडकडीत बंद पाळण्याचा निर्णय येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

सध्या कोरोना हा कासोदा गावाच्या जवळ येऊन ठेपल्याने ग्रामस्थ धास्तावले आहेत. हा भयंकर आजार आपल्या गावाकडे फिरकू नये यासाठी दि.२९ रोजी पोलीस स्टेशन मध्ये सायंकाळी बैठक घेण्यात आली. त्यात दि.१ मे पासून तीन दिवस म्हणजे ३ मे पर्यंत गाव कडकडीत बंद ठेवण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला आहे,यासाठी गावकर्‍यांनी संपूर्ण सहकार्य करणे अत्यंत आवश्यक आहे. यात फक्त दूध आणि मेडिकल हे वगळण्यात आले असून किराणा,भाजीपाला, सर्व दुकाने, बांधकाम हे सगळेच बंद रहाणार आहेत.गावात गल्लीत रस्त्यावर कुणी ही फिरु नये,एकत्र जमू नये,हाच कोरोनाला प्रतिकार करण्यासाठी सोपा मार्ग आहे. गावात कोरोनाला मज्जाव करता यावा, यासाठीच हा कठोर निर्णय घेणेत आला आहे, तो गावाच्या हिताचा असल्याने सर्वांना बंधनकारक असणार आहे.या निर्णयाची कठोर अंमलबजावणी करणे हे प्रत्येक नागरिकांचे आद्य कर्तव्य आहे. या निर्णयाला सहकार्य न करणार्‍या नागरिकांना कठोर दंड देखील आकारण्याची सदस्यांनी शिफारस केली आहे. प्रत्येक स्री पुरुषांनी तोंडाला मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले असून, परगावातील कुणीही नागरिक आपल्या गावात आल्यावर त्वरित पोलीस स्टेशन अथवा सरकारी दवाखान्यात कळवणे आपली जबाबदारी आहे. या नियमांचे पालन करण्याचे आवाहन कोरोना दक्षता समितीने केले आहे.

Exit mobile version