Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कासोद्यातील संशयित तरुणाला जिल्हा रुग्णालयात  दाखल

कासोदा प्रतिनिधी | पुण्यात राहणारा २६ वर्षीय तरुणाला कासोदा प्राथमिक आरोग्य केंद्रात संशयित आढळून आल्याने जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

येथील सव्वीस वर्षीय तरुण लक्ष्मण पांडुरंग पाटील आज पुण्याहून  कासोद्यात आला . ग्रामस्थांनी त्याला आजारी पनाचे लक्षण असल्याचे पाहून त्याला प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवले. तर प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉ.चेतन वाघ, व डॉ.निशाद शेख यांनी त्याला सर्दी, खोकला असल्याचे लक्षण दिसून आल्याने. तरुणांची शासनाच्या निर्देशानुसार तपासणी करून त्याला फेर तपासणी करण्यासाठी जिल्हा आरोग्य केंद्रात रवाना केले.

डॉ. वाघ यांनी नागरिकांना आवाहन केले आहे,  की कोरोना पेशंट भारतात झपाट्याने वाढत आहे, आणि आपल्या गावात शहरातून आलेल्या ग्रामस्थांनी स्वताःहून प्राथमिक आरोग्य केंद्रात येऊन तपासणी करावी. नागरिकांनी घराबाहेर निघू नये, डॉक्टर्स  व पोलीस प्रशासनास मदत करा आपले जीवन आपल्याच हातात आहे. स्वतःची काळजी घ्या व हात धूऊनच घरात प्रवेश करा असे आव्हान केले आहे. तसेच कासोदा  हे मोठ्या बाजार पेठेचे गांव असून कासोदा व परिसरातील  गावांसाठी  तालुक्याच्या ठिकाणी तपासणी केंद्र सुरू करण्यात आले पाहिजे म्हणून या मागणीला  तालुक्यातून उधाण आले आहे. याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी करण्यात येत आहे.

Exit mobile version