Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कासोदा शहरात पोलीसांचे पथसंचलन; कोरोनाबाबत जनजागृती

कासोदा प्रतिनिधी । कोरोना विषाणू हद्दपार करण्यासाठी जनजागृती आणि शब्ब-ए-बारात सणाच्या निमित्त शहरातीत विविध भागात पोलीस ठाण्यातर्फे पथसंचलन करण्यात आले.

यावेळी सपोनि रविंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि नरेश ठाकरे, ट्रायकिंग फोर्स, कासोदा पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड यांनी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास शहरातून पथसंचलन केले. पथसंचलन पोलीस स्टेशनपासून ते मेनरोडमार्गे बिजली शाह चौक, सादिकशहा दर्गाह, भोई गल्ली बसस्टॉप, बिर्ला चौक, चर्मकार गल्ली, मणियार मशीद, आठवडे बाजार येथून काढण्यात आली. संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात नजर ठेवून आहे. कुठल्याही परिस्थितीत वाद होणार नाही व कायदा सुव्यवस्था सुरळीत पार पडेल असे सपोनि रविंद्र जाधव यांनी सांगितले.

कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्यापासूनच कासोद्यातील सर्व चौकांमध्ये आणि सीमावर्ती भागातील मार्गावरील सर्व मुख्य पोलिसांचा २४ तास पहारा आहे. कोरोनाचा प्रकोप वाढू नये, यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी काळजी घेतली जात आहे. पोलीस विभागानेही कायदा व सुव्यवस्था राखण्यासोबतच गरीब नागरिकांच्या जेवणाच्या व्यवस्थेचे नियोजन कोरोना दक्षता समितीच्या माध्यमतून केले आहे. दरम्यान, सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गोरे यांनी गुरूवारी दुपारी कासोदा परिसरातील नाकाबंदी पॉर्इंटला भेट देऊन पहाणी केली. गावातील मशीद, मुस्लिम समाज कब्रस्थान येथे जाऊन पाहणी केली. स्वत: बिर्ला चौकात उभे राहून बंदोबस्ताचा आढावाही घेतला. बंदोबस्तावरील पोलिसांना आवश्यक त्या सूचना देऊन त्यांनीही माहिती जाणून घेतली. त्यानंतर त्यांनी कासोदा पोलीस स्टेशनला जाऊन पहाणी केली. आढावा घेऊन त्यातील त्रुटी जाणून घेतल्या व कायदा सुव्यवस्था राखण्याचे आदेश दिले.

Exit mobile version