Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कासोदा येथे राज मार्ग २५ चे काम पुन्हा सुरू होणार

WhatsApp Image 2020 01 30 at 6.05.14 PM

कासोदा, प्रतिनिधी | येथील ग्रामस्थांनी दि.२६ जानेवारी रविवार रोजी संध्याकाळी सुरू असलेले राजमार्ग २५ चे काम निष्कृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप करत बंद केले होते. यानंतर नागरिकांसोबत झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांनी राज मार्ग २५ चे काम पुन्हा सुरु करण्याचे आश्वसन दिले आहे.

सविस्तर असे की, राजमार्ग २५ चे बहाळ, कोळगाव, भडगाव, कासोदा – एरंडोल या रस्त्याचे नव्याने काम सुरू असून, रस्त्याच्या साईड पट्ट्यांचे काम सुरू होते. त्यात जेसीबी मशीन द्वारे हे कामसुरु असल्याने तात्काळ त्याच्यावर माती मिश्रीत मुरूम टाकून लागलीच रोलरच्या सहाय्याने दाबले जात असल्याचे ग्रामस्थांना दिसले असता. ते काम निषकृष्ट दर्जाचे होत असल्याचे दिसून आले. तर येथील ग्रामस्थ व पत्रकार यांनी तात्काळ काम बंद करावे व आपले अंदाजपत्रक दाखवून ते काम अंदाजपत्रका नुसार व्हावे. म्हणून येथील सुज्ञ नागरिक , भाजपा युमो तालुका अध्यक्ष नरेश ठाकरे, शिवसेना तालुका उपप्रमुख रवींद्र चौधरी , पत्रकार सागर शेलार व आदी ग्रामस्थांनी काम बंद केले. भडगाव येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता विरेंद्र राजपूत यांना भ्रमणध्वनी द्वारे कळवून याकामास स्थगिती आणली. आज दि. ३० जानेवारी गुरुवार रोजी ग्रामपंचायतला भडगाव विभागाचे अभियंता विरेंद्र राजपूत साहेब व ठेकेदार टीम लिडर विक्रमसिंग , रामआवतार साहेब , प्रोजेक्ट मॅनेजर नायर , भैय्या राक्षे , पत्रकार प्रमोद पाटील, सागर शेलार, राहुल मराठे, जितु ठाकरे , तालुका उपप्रमुख रवींद्र चौधरी, भाजपा यु मो तालुका प्रमुख नरेश ठाकरे, निलेश अग्रवाल, बंटी ठाकरे, इंजि. गोपाल भोई, उमेश पाटील, पप्पू शिंदे व राकेश जाधव आदी ग्रामस्थांसह जनरल मीटिंग घेण्यात आली. त्याप्रसंगी आलेल्या कंपनीच्या सर्व ठेकेदार पदाधिकाऱ्यांनी व अभियंता राजपूत साहेब यांनी काम का ? बंद केले याबाबत सविस्तर माहिती जाणुन घेतली . त्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. भैय्या राक्षे यांनी गावपातळी वरील समस्या सांगितल्या व ज्या – ज्या ठिकाणी कामात कमतरता होती व अंदाजपत्रकात नसलेल्या बाबींचा समावेश करावा त्याठिकाणी ग्रामस्थांच्या समवेत पदाधिकारी व ठेकेदारांनी येऊन पाहणी केली. तसेच ग्रामस्थांनी अभियंता राजपुत व ठेकेदार यांना लेखी निवेदन देऊन गावाच्या सुरुवातीपासुन ते शेवटपर्यंत कॉंक्रीट रस्ता व दोन्ही बाजूस काँक्रीट गटार घेण्यात यावी, त्याच रस्त्यावरील जुने व जीर्ण झालेले पूल पडून नवीन पूल बांधण्यात यावे. गांवातील खेकड्या नाल्याजवळील उत्राण रोड लागत चौफुली, पारोळा – फरकांडे चौफुली व सेंट्रल बँके समोरील चौफुली यावर रोटरी सर्कल घेण्यात यावे. जेणेकरून गांवातील सौंदर्यीकणात भर पडेल असे निवेदनात निवेदन देण्यात आले. या निवेदनाची दखल घेऊन समस्यांचे निराकरण करू व वरील अधिकाऱ्यांपर्यंत पाठपुरावा करण्याचे आश्वासन अभियंता राजपूत यांनी दिले यावेळी दिले.

Exit mobile version