Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

काशी विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा पराभव

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । पंतप्रधान नरेंद्र मोदी खासदार असणाऱ्या वाराणसी मतदारसंघामधील महात्मा गांधी काशी विद्यापीठामधील विद्यार्थी निवडणुकांमध्ये भाजपाची विद्यार्थी संघटना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला मोठा फटका बसला आहे.

 

भाजपाची विद्यार्थी संघटना चारही महत्वाच्या जागांसाठी झालेली निवडणूक हारली आहे. या पराभवानंतर एबीव्हीपीने आत्मरिक्षण तसेच पराभव कसा झाला यासंदर्भातील कारणांचा शोध घेण्यास सुरुवात केलीय. या निवडणुकींमध्ये समाजवादी पक्षाची विद्यार्थी संघटना समाजवादी छात्र सभाच्या विमलेश यादव याने विजय मिळवला आहे. काँग्रेसची विद्यार्थी संघटना एनएसयूआयने दोन जागांवर विजय मिळवलाय.

 

एनएसयूआयकडून उपाध्यक्षपदी संदीप पाल आणि महामंत्री पदाच्या जागेवर प्रफुल्ल पांडेय यांनी विजय मिळवला आहे. तर पुस्तकालय मंत्री म्हणून अपक्ष उमेदवार आशीष गोस्वामीचा विजय झालाय.या निवडणुकीमध्ये एकूण चार हजार २९४ विद्यार्थ्यांनी मतदान केलं.

 

 

. मोदींच्या मतदारसंघामध्येच विद्यार्थी संघटनेला अपयश हे तरुणांमध्ये पक्षाचा प्रभाव कमी पडतोय का असा प्रश्न उपस्थित करायला लावणारं आहे अशी चर्चा रंगू लागली आहे.

Exit mobile version