Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यानात २६/११च्या शहिद जवानांना भावपूर्ण श्रध्दांजली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज रेल्वेस्थानकावर झालेल्या २६/११ रोजीच्या दहशतवादी भ्याड हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निरपराध निष्पाप नागरिकांना व शहीद जवानांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यानात शनिवार २६ नोव्हेबर रोजी सायंकाळी ७ वाजता हास्य परिवारातर्फे मेणबत्ती पेटवून भावपूर्ण श्रध्दांजी अर्पण करण्यात आली.

शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यानात २६ नोव्हेंबर २००८ च्या मुंबई येथील भ्याड हल्ल्यात अतिरेक्यांशी लढतांना शहिद झालेल्या हुतात्म्यांचे पुण्यस्मरण व श्रद्धांजली कार्यक्रम शहरातील हास्य परिवाराच्या वतीने घेण्यात आला. यावेळी परिवारसह इतर नागरीकांनी हातात मेणबत्ती घेवून श्रध्दांजली अर्पण केली. या कार्यकमात कर्नल कॅप्टन पांढरे यांनी २६/११ या दहशतवादी हल्ल्याबाबतची घटना कशी घडली याचे वाचन करून दाखविले. याप्रसंगी हास्य परिवाराचे आश्वीन गांधी, मोठाभाई मिस्तरी, मिश्रा सोनवणे, ज्योती देवरे, रेखा निकम, अनिता सोनवणे, ज्योती सातपुते, नयना जाधव, स्मिता चौधरी, नंदा मुनोत, माधवी पाटील, वंदना चव्हाण, कविता पवार, निता बिछवे यांच्यासह नागरीक उपस्थित होते.

Exit mobile version