Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

काव्यरत्नावली चौकात विवाहितेचा मोबाईल हिसकावून अज्ञात दोघे फरार

जळगाव प्रतिनिधी । काव्यरत्नावली ते आकाशवाणी दरम्यान अज्ञात दोन भामट्यांनी दुचाकीवर येवून शतपावली करणाऱ्या विवाहितेच्या हातातून मोबाईल बळजबरी हिसकावून पळ काढल्याची प्रकार बुधवारी रात्री घडला. रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, विजया सुनिल पवार (वय-३६) रा. शिवाजी नगर हुडको ह्या कामाच्या निमित्ताने काव्यरत्नावली चौकात आल्या होत्या. काव्यरत्नावली चौकत ते आकाशवाणी चौक दरम्यान अक्सीस बँकेजवळून पायी जात असतांना २० ते २५ वयोगटातील अज्ञात दोन भामटे दुचाकीवर येवून विवाहितेच्या हातातून मोबाईल बळजबरी हिसकावून दुचाकीवरून पळून गेले. महिलेले आरडा ओरड केली मात्र तोपर्यंत दोघे पसार झाले होते. विजया पवार यांच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार गोपाल चौधरी करीत आहे.

Exit mobile version