Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

काल सुरक्षा काढली आणि आज गोळ्या घालून हत्या

चंदीगड – लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसंस्था । पंजाबमधील आप सरकारने काल ४२४ जणांची सुरक्षा काढण्याच्या निर्णयावर अंमलबजावणी केली होती. त्याला एक दिवस उलटत नाही तोवर काँग्रेस नेते आणि पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे.

ही घटना राज्यातील मानसा जिल्ह्यात घडली असून यात अन्य दोन जण जखमी झाले आहेत. सुरक्षा काढण्यात आलेल्यांपैकीच मुसेवाला एक होते. यावर्षी झालेल्या पंजाब विधानसभा निवडणुकीत मुसेवाला यांनी काँग्रेसकडून मानसा जिल्ह्यातून डॉ. विजय सिंघला यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. ज्यात आम आदमी पक्षाचे डॉ. सिंघला यांनी त्यांचा पराभव केला होता.

गायक सिद्धू मुसेवाला यांच्यावर अकालीचे नेते विक्कू मिद्दूखेडा यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप होता. ते पुढील आठवड्यात गुडगावमध्ये आपला शो करणार होते. गेल्यावर्षी त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अलीकडेच मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सिंघला यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली आहे.  भगवंत मान सरकारने काल सेवानिवृत्त अधिकारी आणि माजी आमदारांसह ४२४ व्हीआयपी लोकांची सुरक्षा काढून घेतली होती. यापूर्वी सुद्धा पंजाब सरकारने माजी मंत्री आणि नेत्यांसह १८४ लोकांची सुरक्षा काढून घेण्याचा निर्णय घेतला होता. पंजाबमधील काँग्रेस उमेदवार आणि संगीतकार सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येने काँग्रेस पक्ष आणि देशाला धक्का बसला आहे.

Exit mobile version