Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कालव्यातून एकाची इलेक्ट्रीक मोटारीची चोरी.

भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भडगाव तालुक्यातील कनाशी येथील शिवारातील कालव्यातून एका शेतकऱ्याची ईलेक्ट्रीक मोटारीची चोरी केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी बुधवारी २२ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, धनराज रूपला पाटील (वय-७५) रा. कनाशी ता. भडगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांनी कनाशी शिवारात विश्वास काशिनाथ पाटील यांचे शेत भागिदारीने केले आहे. जवळील जामदा कालव्यावर त्यांनी ईलेक्ट्रीक मोटार बसविली आहे. शेतातला पाणी या मोटारीच्या माध्यमातून दिले जाते. २१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ ते २२ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी १८ हजार रूपये किंमतीची इलक्ट्रीक मोटार चोरून नेल्याचे उघडकीला आले. त्यांनी मोटारीचा सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली आहे. अखेर बुधवारी २२ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता त्यांनी भडगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून भडगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक नरेंद्र विसपुते करीत आहे

Exit mobile version