Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कारमधून मेडीकल व्यावसायिकाची दीड लाखांची रोकड लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील सागर पार्क समोरील पेट्रोल पंपाजवळ उभ्या असलेल्या कारच्या मागच्या सीटीवरून दीड लाख रूपये ठेवलेली पिशवी अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी गुरूवार ९ फेब्रुवारी रोजी रात्री उशीरा रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, कनकमल उत्तमचंद राका (वय-६८) रा. हॉटेल रॉयल पॅलेस मागे जय नगर, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. मेडीकल व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतात. बुधवार ८ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घरी जात असतांना त्यांच्या कारचे टायर पंचर झाले. त्यामुळे ते सागर पार्कसमोरील पेट्रोल पंपाजवळ पंक्चर काढण्यासाठी आले. त्यांनी कारच्या मागच्या सीटवर दीड लाख रूपये असलेली पिशवी ठेवलेली होती. पंचर काढत असतांना कारमधील सीटवरून दीड लाख रूपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटन घडली. त्यांनी सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. त्यांनी लागलीच रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून गुरूवार ९ फेब्रुवारी रोजी रात्री उशीरा रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शांताराम पाटील करीत आहे.

Exit mobile version