Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कारण नसतांना महिलेच्या डोक्यात टाकला रॉड

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील वाघ नगरात राहणाऱ्या महिलेला काहीही कारण नसतांना डोक्यात लोखंडी रॉड टाकून गंभीर दुखापत केल्याची घटना रामानंदनगर घाटाजवळ घडली. याप्रकरणी मंगळवारी ७ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील वाघ नगर परिसरातील पुनम प्रभाकर जाधव (वय-३८) या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. सोमवारी ६ मार्च रोजी सकाळी ११ वाजता त्या रामानंद नगर परिसरातील घाटजवळून पायी जात असतांना प्रज्ञा ॲटो गॅरेज येथे सिध्दार्थ भाऊसिंग सैंदाने रा. श्रीधर नगर, जळगाव याने काहीही कारण नसतांना महिलेच्या कानशिलात लगावली, त्यानंतर तिला शिवीगाळ करून हातातील लोखंडी रॉड डोक्यात टाकला. यात महिला गंभीर जखमी झाली. त्यांना तातडीने जिल्हा शाासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. याप्रकरणी  मंगळवारी ७ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता महिलेने रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी सिध्दार्थ भाऊसिंग जाधव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस कॉन्स्टेबल उषा सोनवणे करीत आहे.

Exit mobile version