Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कारण नसतांना दोन मित्रांना बेदम मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरातील बाजार पट्ट्यात दोन जणांना काहीही कारण नसतांना चार अनोळखी तरूणांनी लाकडी दांडा, लोखंडी सळई आणि दगडाने मारहाण करून दुखापत केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शनिवारी ११ मार्च रोजी दुपारी ३ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

रामानंदनगर पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, सुनिल गणपत दोडे (वय-४३) रा. चंदूआण्णा नगर, जळगाव हे आपल्या कुटुंबासह राहतात. शुक्रवारी १० मार्च रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास सुनिल दोडे हे त्यांचे मित्र संजय पाटील यांच्यासोबत बोलत उभे होते. त्यावेळी चार अनोळखी तरूण त्यांच्याजवळ येवून काहीही कारण नसतांना लाकडी दांडा, लोखंडी सळई आणि दगडचा वापर करून दोघांना बेदम मारहाण केली. यामध्ये दोघेजण जखमी झाले. त्यांच्या डोक्याला व छातीला गंभीर दुखापत झाल्याने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी सुनिल दोडे यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. शनिवारी ११ मार्च रोजी दुपारी ३ वाजता सुनिल दोडे यांच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक कालसिंग बारेला करीत आहे.

Exit mobile version