Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कारण नसतांना एकाला बेदम मारहाण

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली येथे शेतकऱ्याला काहीही कारण नसतांना चार जणांनी शिवीगाळ करून बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी बुधवारी १५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली येथे अविनाश बाबुलाल पाटील (वय-४१) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. बुधवारी १५ फेब्रुवारी रोजी गावात यात्रा होती. त्यावेळी रात्री ११ वाजेच्या सुमारास काहीही कारण नसतांना गावातील कुंदन गोपीचंद राजपूत, सुयोग प्रदीप राजपूत, प्रकाश मधु गायकवाड आणि रतन मधु गायकवाड यांनी शिवीगाळ करून तलवारने वार करून मारहाण केली. या घटनाप्रकरणी अविनाश पाटील यांनी पाचोरा पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून बुधवारी १५ फेब्रुवारी रेाजी रात्री उशीरा चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार प्रकाश पाटील करीत आहे.

Exit mobile version