Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कारण नसतांना एकाला चौघांकडून मारहाण 

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । शिरसोली दापोरा रोडवर काहीही कारण नसताना तरुणाशी वाद घालून चौघा भावांनी बेदम मारहाण करून दुखापत केल्याची घटना शुक्रवार ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता घडली. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात ४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अतुल अशोक ढवळे (वय-३८) रा. ल हनुमान मंदिर शेजारी दापोरा जळगाव हा आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शुक्रवार ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता शिरसोली ते दापोरा रोडवर असलेल्या एका ठिकाणी काहीही कारण नसताना अतुल ढवळे याच्याशी नाना दशरथ देवरे यांनी वाद घातला. त्यानंतर नाना दशरथ देवरे, रवींद्र दशरथ देवरे, बंडू दशरथ देवरे आणि गोपाल दशरथ देवरे राहणार दापोरा ता. जिल्हा जळगाव यांनी शिवीगाळ करून बेदम मारहाण केली. यामध्ये अतुल ढवळे हा जखमी झाला आहे.

याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात रात्री ९ वाजता संशयित आरोपी नाना देवरे, रवींद्र देवरे, बंडू देवरे आणि गोपाल देवरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.ना. समाधान पाटील करत आहे.

Exit mobile version