Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कारची समोरुन येणाऱ्या दोन दुचाकींना धडक

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव आसोदा रोडवर कारने समोरुन येणाऱ्या दोन दुचाकींना धडक दिल्याने दोन्ही दुचाकींवरील तीन जण जखमी झाल्याची घटना घडली होती. या घटनेप्रकरणी बुधवार, २४ मे रोजी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात कारचालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

 

यावल येथे अमृत बाबुराव बारी वय ४० हे वास्तव्यास आहेत. ते त्यांच्या १४ मे रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास त्यांच्या एम.एच. १९ ए.जी. ४२४५ या क्रमाकांच्या दुचाकीने कामानिमित्ताने जळगाव आसोदा रोडने जात होते. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे यावल येथील त्यांचे सहकारी गणेश पंडीत बाविस्कर व अशफाक अली मुजफ्फर अली सय्यद हे त्यांच्या एम.एच.१९ ए.डी. ६८८८ या क्रमाकांच्या दुचाकीवरुन जात होते. यादरम्यान एम.एच.४३ ए.एन २६९१ या क्रमाकांच्या भरधाव कारने समोरुन येणाऱ्या बारी तसेच त्यांचा मित्र गणेश बाविस्कर या दोघा दुचाकींना जोरदार धडक दिली. यात घटनेत अमृत बारी, तसेच दुसऱ्या दुचाकीवरील गणेश बाविस्कर व अशफाक अली हे तिघे जखमी झाले, तसेच दोन्‍ही दुचाकींचे नुकसान झाले. अपघातानंतर कारचालक हा घटनास्थळी न थांबता घटनास्थळावरुन पसार झाला. या अपघातप्रकरणी जखमी असलेल्या अृमत बारी यांनी उपचारानंतर तब्बल १० दिवसानंतर बुधवारी तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरुन कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल वासुदेव मराठे हे करीत आहेत.

Exit mobile version