Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कायदा हातात घेणार असतील तर ….!

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा – एसटी कर्मचाऱ्याच्या संपाबाबत न्यायालयाचा निर्णय मिळाला आहे, या निर्णयाचे आम्ही स्वागतच करतो, परन्तु कोणाच्याही सांगण्यावरून एसटी कर्मचारी किंवा कोणीही कायदा हातात घेत असेल तर राज्य सरकार हातावर हात ठेवून स्वस्थ बसणार नाही, असा सूचक इशारा परिवहन मंत्री अनिल परब यांनी आंदोनलकर्त्या एसटी कर्मचाऱ्यांना दिला.

शुक्रवारी दुपारच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवास्थानाबाहेर काल काही एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केल्याने व चप्पला फेकल्याने एकच खळबळ उडाली. त्यानंतर घडलेल्या घडामोडींवर प्रतिक्रिया दिली आहे. एसटी कर्मचाऱ्याचा संदर्भात सुरुवातीपासूनच राज्य सरकारची नेहमीच सहानुभूतीची भूमिका आहे, गेल्या पाच महिन्यापासून सम्प शांततेच्या मार्गाने सुरु होता. दरम्यान अनेकांनी भडक भाषणे देखील केलीत, परंतु राज्य सरकारने नेहमीच सामंजस्याची भूमिका घेतली आहे. परंतु, कालची घटना पाहता कधी कोणी कायदा हातात घेतला की राज्य सरकार हातावर हात धरून बसणार नाही.
एसटी संपकरी कर्मचारी आमचेच कामगार आहेत. कर्मचाऱ्यांच्याबाबतीत नेहमीच सरकारचे सहानभुतीचंच धोरण राहिले आहे. सरकार कोणावरही अन्याय करू इच्छित नाही. कर्मचाऱ्यांनी कामावर रूजू व्हावं, आपला रोजगार सांभाळून एसटी व्यवस्थित चालवावी, सर्वसामान्य ग्रामीण जनतेच्या त्रासापासून मुक्तता व्हावी यासाठी सर्व बाजूने प्रयत्न केले जात आहेत. कर्मचाऱ्यांच्या अनेक गटांना सामोपचाराने देखील समजण्यात येत आहे. त्यांच्या न्याय मागण्यासाठी विचार करणे हे कर्तव्य आहे. आणि ज्या कारणासाठी एसटी कर्मचारी लढा देत होते, त्या त्याचा निकाल देखील उच्च न्यायालयाने दिलेला आहे, उच्च न्यायालयाचे दिलेले आदेश पाळायचे कि त्यांच्या नेत्याचे आदेश पाळायचे हे संपकरी कर्मचाऱ्यांनी ठरवावे. परंतु कायदा हातात घेऊन जर अशाप्रकारे लोकांची माथी भडकवत असतील, सरकारवर दबाव टाकत असतील तर ते राज्य सरकार कधीच मान्य करणार नाही. याबाबत राज्य सरकार नक्कीच कठोर कारवाई करणार असल्याचा इशारा परिवहन मंत्री परब यांनी दिला.

Exit mobile version