कापूस उत्पादक सेवा सहकारी संस्थेच्या शॉपिंग कॉम्प्लेसचे पालकमंत्री यांच्याहस्ते भूमिपूजन !

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील कानळदा येथे तालुका कापूस उत्पादक सेवा सहकारी संस्थेच्या शॉपिंग कॉम्प्लेस व गोडाऊनचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते भूमिपूजन करण्यात आले. तालुक्याच्या सहकार क्षेत्रात कानळद्याचे योगदान असून सहकार जगला तरच शेतकरी जगेल, असे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील हे होते. भूमिपूजन प्रसंगी पालकमंत्री म्हणाले की, तालुक्याचा सहकार क्षेत्रात कानळद्याचे योगदान असून पणन चे संचालक व कापूस उत्पादक सेवा संस्थेच्या चेअरमन व संचालकांचे कार्य कौतुकास्पद आहे. कानळदा संस्थेचा प्रगतीसाठी सतत प्रयत्नशील राहणार असल्याचेही सांगितले. यावेळी ना. गुलाबराव पाटील यांनी संस्थेला (५१ हजार) एक्कावन हजाराची देणगी ही जाहीर केली.

संजय पवार व रवींद्र भैय्या पाटील यांनी पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या कार्याच्या गौरव करून कापूस उत्पादक संस्थांना शासनातर्फे मोठ्या प्रमाणात आर्थिक पाठबळ देण्याबाबत साकडे घातले. यावेळी संजय पवार यांनी संस्थेला (५० हजार) पन्नास हजाराची मदत जाहीर केली.

यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा संचालक रवींद्रभैय्या पाटील, पणन महासंघाचे संचालक संजय पवार, सेवानिवृत्त डीवायएसपी पुंडलिक सपकाळे, कृ.उ.बा. समिती सभापती कैलाश चौधरी, शेतकी संघाचे अध्यक्ष रमेश पाटील, पं.स.सदस्य जना आप्पा सोनवणे, अरविंद मानकरी, सामाजिक कार्यकर्ते रविभाऊ देशमुख, संस्थेचे संचालक सतीष चव्हाण, भागवत भंगाळे, रघुनाथ सपकाळे, राजेंद्र कंखरे, रवी चव्हाण, पिक संरक्षणचे भागवत भंगाळे, जयराज चव्हाण, गोकुळ लंके, प्रवीण भोळे, भाजपा तालुका अध्यक्ष गोपाल भंगाळे यांचासह सहकार क्षेत्रातील मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सेवानिवृत्त डी.वाय.एस.पी. पुंडलिक सपकाळे यांनी संस्थेच्या वाढत्या विकासाचे महत्व विषद केले तर सूत्र संचालन उपशिक्षिका छाया पाटील यांनी केले. आभार संस्थेचे चेअरमन अशोक कंखरे यांनी मानले.

Protected Content