Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कानळदा रोडवर दुचाकीच्या दुचाकीस्वार गंभीर जखमी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील कानळदा रोडवर भरधाव वेगाने येणार्‍या दुचाकीस्वाराने समोरुन येणार्‍या दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघातात दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी झाले. याप्रकरणी रविवारी १२ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजता जळगाव तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, चोपडा तालुक्यातील खडगाव येथील योगराज अशोक पाटील (वय-२४) हा तरुण त्याचा मित्र ऋतीक पाटील याच्यासोबत शनिवारी ११ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता सायंकाळच्या सुमारास (एमएच १९ आर ६३४३) क्रमांकाच्या दुचाकीने कानळदा रोडवरुन खडगावला जाण्यासाठी निघाले. त्याठिकाणी नवीन पुलाचे बांधकाम सुरु असल्याने समोरुन भरधाव वेगाने येणार्‍या (एमएच १९ बीआर ५१३७) क्रमांकाच्या दुचाकीने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात ऋतीक हा गंभीर जखमी झाला असून त्याच्या दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या घटनेबाबत रविवारी १२ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजता योगराज पाटील याच्या तक्रारीवरुन वाहनचालकाविरुद्ध तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना रामकृष्ण इंगळे करीत आहे.

Exit mobile version