Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कांदा प्रश्नावर केंद्र सरकारने लक्ष घालण्याची गरज — शरद पवार

नाशिक : वृत्तसंस्था । कांदा प्रश्नावर केंद्र सरकारने लक्ष घालण्याची गरज आहे कांद्याच्या दरात कायम चढ उतार चिंतेची बाब असून कांदा आयात निर्यतीचे सर्व अधिकार केंद्राकडे असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

निर्यात बंद करणं आणि आयात सुरु करणं परस्परविरोधी निर्णय असल्याची टीका शरद पवारांनी केली आहे. शरद पवार नाशिक दौऱ्यावर असून त्यांच्या अध्यक्षतेखाली कांदा प्रश्नावर महत्तपूर्ण बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते.

“राज्य सरकारकडून जास्त अपेक्षा करू नये. कारण त्यांना अधिकार नाही. धाडी घालण्याच्या सूचना राज्य सरकारकडून नाही. व्यापाऱ्यांवर होणाऱ्या कारवाईचा राज्य सरकारचा संबंध नाही. निर्यातबंदी, आयात या संदर्भातील निर्णय राष्ट्रीय पातळीवर होतात,” असं शरद पवार यांनी म्हटलं. आंतरराष्ट्रीय बाजारात नाशिकचा कांदा असतो असं यावेळी त्यांनी नमूद केलं. . शरद पवारांनी यावेळी बाजार बंद ठेवणं हा तोडगा नसून व्यापाऱ्यांना कांद्याचा लिलाव सुरु करण्याचं आवाहन केलं.

परदेशातून आयात वाढल्याने घाऊक बाजारात कांद्याचे दर स्थिर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नवी मुंबईतील घाऊक बाजारात पाच हजार ८४४ क्विंटल कांदा आयात झाल्याने दर साठ रुपयेपर्यंत मर्यादित राहिले आहेत. राज्यात कांदा उत्पादन करणाऱ्या जिल्ह्य़ात यावेळी पडलेल्या मुसळधार पावसाने कांदा साठय़ावर पाणी फेरले आहे. राज्यासह देशातील कांदा उत्पादन कमी झाल्याने कांद्याचे भाव वाढलेले आहेत. तुटवडा भरून काढण्यासाठी केंद्र सरकारने इराक, अफगाणिस्तान यासारख्या देशांतून कांदा आयात करण्यास परवानगी दिली आहे.

Exit mobile version