Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

काँग्रेस सेवा फाउंडेशन तालुकाध्यक्षपदी राजेंद्र चौधरी

यावल प्रतिनिधी । तालुका काँग्रेस सेवा फाउंडेशन तालुकाध्यक्षपदी राजेंद्र चौधरी यांची तर भुपेंद्र जाधव यांची जळगाव जिल्हा काँग्रेस सेवा फौंडेशनच्या जिल्हा सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे .

ही निवड प्रदेशाध्यक्ष अॅड. सुभाष गोडसे यांच्या आदेशाने जिल्हाध्यक्ष जलील पटेल यांनी केली आहे. निवडी बाबत दोघा नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड संदीप भैय्या पाटील, आमदार शिरीष चौधरी, जिल्हापरिषदेचे गटनेता प्रभाकर सोनवणे, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस अजबराव पाटील, महाराष्ट्र काँग्रेस सेवा फाउंडेशन चे प्रदेश सरचिटणीस गौरवसिंग चौहान, रावेर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, राजीव पाटील, नगराध्यक्ष दारा मोहम्मद, शहराध्यक्ष डॉ. शब्बीर खान, शैलेश पाटील, नगरसेवक आसिफ भाई, राजुभाई सुवरणे, अॅड . योगेश गजरे, राजीव पाटील (मोरगाव), सर्व नगरसेवक सर्व रावेर तालुका व शहरातील कार्यकर्ते सर्व फ्रंटचे अध्यक्ष, जिल्ह्यातील सर्व काँग्रेस पक्षाचे नेते, पदाधिकारी कार्यकर्ते यांनी अभिनंदन केले आहे.

Exit mobile version