Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

काँग्रेस अनु.जाती विभागातर्फे शहिदांना श्रद्धांजली

भुसावळ, प्रतिनिधी । काँग्रेस अनु.जाती विभागातर्फे भुसावळ शहरातील नाहटा काँलेज जवळील कारगिल शहिद स्मारकाजवळ गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या २० भारतीय जवानांना “शहीदों को सलाम दिवस” अंतर्गत मेणबत्ती पेटवून श्रद्धांजली अर्पण करुन वंदन करण्यात आले. तसेच याप्रसंगी चीनने केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यात आला.

गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या २० भारतीय जवानांना “शहीदों को सलाम दिवस” अंतर्गत काँग्रेस अनु.जाती विभागातर्फे मेणबत्ती पेटवून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उत्तर महाराष्ट्राचे समन्वयक योगेंद्र पाटील, जळगाव जिल्हा काँग्रेस अनु.जाती विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष विवेक नरवाडे ,जिल्हा सरचिटणीस रहिम कुरेशी, उपाध्यक्ष इस्माईल गवळी, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष इमरान खान, विक्रम वानखेडे, मयुर साळवे, कैलास अहिरे, दिलीप क्षिरसागर, नासीर शेख, गफ्फुर गवळी आदि उपस्थित होते.

Exit mobile version