Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

काँग्रेसच्या शोकसभेत जीडीपीला श्रद्धांजली !!

नवी दिल्ली  वृत्तसंस्था । व्यक्तीच्या निधनानंतर शोकसभा भरवली जाते, पण, देशाचा जीडीपी घसरला म्हणून ऑगस्टमध्ये आलेल्या जीडीपीच्या आकड्यानंतर काँग्रेसनं जीडीपी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शोकसभा आयोजित केली होती .
ऑगस्टच्या अखेरच्या आठवड्यात आलेले जीडीपी आकडे ऐतिहासिक घसरणीचे ठरले. चार दशकात पहिल्यांदाच भारताच्या जीडीपीत मोठी घसरण झाली. मागील तिमाहीत झालेल्या जीडीपीच्या घसरणीनंतर विरोधकांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. आग्र्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी भाजपा सरकारविरोधात टीका करताना चक्क जीडीपीच्या निधनाचीच शोकसभा आयोजित केली.

राम टंडन म्हणाले,”नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकारच्या काळात जीडीपीची सतत होणारी घसरण हे भारतासाठी एक डाग आहे,” सध्याच्या आर्थिक परिस्थितीकडे दुर्लक्ष केल्याबद्दलही टंडन यांनी मोदी सरकारला दोषी ठरवलं.
“ काँग्रेसनं पक्षानं शोकसभा आयोजित केली कारण मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशाचा जीडीपी मृत पावला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये देशाचा जीडीपी कमी होत असला तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं त्याकडे लक्ष दिलं नाही” असा आरोपही टंडन यांनी केला. यावेळी अनेक काँग्रेस नेत्यांनी जीडीपीच्या पोस्टर समोर पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. त्याचबरोबर दोन मिनिटं स्तब्ध राहून शोक व्यक्त करण्यात आला.
=======================

 

Exit mobile version