Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

काँग्रेसच्या नेत्याची ट्विट्स पाकिस्तान आणि चीनला आवडताय : अमित शहांची राहुल गांधींवर टीका

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) चीनच्या मुद्द्यावरुन बोलताना, राहुल गांधी उथळ विचारांचे राजकारण करत आहेत, आम्ही ससंदेत प्रत्येक पश्चावर उत्तर देण्यास तयार असून संसेदतील चर्चेसाठी सज्ज आहोत. एवढेच नव्हे तर काँग्रेसच्या नेत्याची ट्विट्स पाकिस्तान आणि चीनला आवडत असल्याचे म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी राहुल गांधींवर टीका केली आहे.

 

एएनआयला दिलेल्या मुलाखतीत अमित शहा म्हणाले की, काँग्रेससारख्या मोठ्या पक्षाचे माजी अध्यक्ष अत्यंत घाणेरडे राजकारण करत आहेत, याची मला कीव येते आहे. काँग्रेसच्या नेत्याची ट्विट्स पाकिस्तान आणि चीनला आवडत आहेत ही बाब दुर्दैवी आहे. लाईन ऑफ एक्च्युअल कंट्रोलवर भारत आणी चीन या दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भारत ही लढाई जिंकत असल्याचे मला आधीच स्पष्ट करावे लागेल, असे अमित शहांनी म्हटले. कोरोनाची लढाई भारताने अत्यंत स्थैर्याने आणि धैर्याने लढली आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वात करोनाची लढाई अत्यंत धैर्याने आपण लढलो आहोत. जगाच्या तुलनेत आपण करोनाशी अत्यंत उत्तमरित्या लढलो आहोत. आपल्याकडे परिस्थिती जगाच्या तुलनेत बरीच नियंत्रणात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आणि दिवे लावले गेले, घंटा वाजवल्या गेल्या. एकाही पोलिसाशिवाय कर्फ्यू पाळला गेला. यासारखी बाब मी तरी माझ्या कारकिर्दीत पाहिलेली नाही. हे सगळं मोदींच्या नेतृत्त्वामुळे शक्य झालं आहे असं गृहमंत्री अमित शाह यांनी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी करोनापुढे हात टेकले हे म्हणणे साफ चुकीचे आहे ,असे म्हणत अमित शाह यांनी राहुल गांधींना प्रत्युत्तर दिले आहे. दरम्यान, गलवान खोऱ्यातील भारत-चीन संघर्षानंतर काँग्रेसकडून मोदी सरकारला सातत्याने धारेवर धरले जात आहे. चीनविषयक मोदी सरकारच्या धोरणांवर काँग्रेसकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. राहुल गांधी यांनी तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘सरेंडर मोदी’, असे संबोधले होते.

Exit mobile version