Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

काँग्रेसच्या ग्रामस्तरीय मंडळ कमेटीच्या रचना कार्यक्रमास प्रतिसाद

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यात काँग्रेस कमेटीच्या वतीने मंडळ कमीटी रचना, ग्रामस्तरीय कमिटी आणि प्रभाग कमीटीच्या पदाधिकारी यांची बैठक जिल्हाधिकारी प्रदीप पवार, आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार रमेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्तरीय काँग्रेस कमेटी व मंडळ स्तरीय कमेटी तसेच बुथ कमेटी तयार करण्याबाबत बैठक घेण्यात आली.

याप्रसंगी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रभाकर अप्पा सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक घेण्यात आली. तालुक्यातील साकळी दहिगाव जि,प गटातील दहिगाव गणातील कोरपावली, महेलखेडी, दहिगाव चुचाळे या गावात सदर अभियान राबविण्यात आले. यावेळी गावातील कार्यकर्ते गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रामुख्याने तरुण वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले सदर अभियानात माजी आमदार रमेश चौधरी, प.स.गटनेते शेखर पाटील, साकळी दहिगाव गटप्रमुख संदीप सोनवणे, प्रदेश सरचिटणीस जलील पटेल, कोरपावली येथील काँग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते पिरण पटेल, कोरपावलीचे सरपंच विलास अडकमोल, उपसरपंच हमीदाबी पटेल, ग्रामपंचायत सदस्य सत्तार तडवी, आरिफ तडवी, महेबूब तडवी, कोरपावलीचे समाजसेवक मुक्तार पटेल, काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी उमेश जावळे, शकिल तडवी,, महेलखेडी येथे सरपंच शरिफा तडवी, उपसरपंच जयंता पाटील, सुदाम पाटील, सलीम तडवी, ग्रा.पं. सदस्य अशोक तायडे, दिनकर पाटील, भिका पटेल, सरफराज तडवी, सुनील महाजन, अरविंद अडकमोल, भिकारी तडवी, आणि ग्रामस्थ कार्यकर्ते , दहिगावचे लोकनियुक्त सरपंच अजय अडकमोल गणप्रमुख दिनकर फेगडे, सह गण प्रमुख प्रकाश कोळी, माजी सरपंच दिलीप पाटील, गौरव महाजन, रहीम पटेल, उल्हास महाजन,शेख इम्रान,विजय बाविस्कर, सह गावकरी कार्यकर्ते पदाधिकारी मोठया संख्येत उपस्थित होते. चुचांळे येथील जेष्टनेते मसाकाचे माजी संचालक नत्थु तडवी, रहेमान तडवी, पप्पू पाटील,योगेश पाटील, सलीम तडवी सह कार्यकर्ते युवक, मोठ्या संख्येने सदर अभियानात उपस्थित होते *

Exit mobile version