Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

काँग्रेसचे बहूमत असतांनाही उपसरपंचपद मात्र भाजपाला !

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील दहिगाव येथील ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदाची निवड आज सोमवार, दि. १२ सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच अजय अडकमोल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यात ईश्वरचिठ्ठीने कृषिउत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक देविदास धागो पाटील यांची निवड करण्यात आली आहे.

तालुक्यातील दहिगाव येथील ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदाची निवड आज सोमवार, दि. १२ सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच अजय अडकमोल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यात ईश्वरचिठ्ठीने कृषिउत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक देविदास धागो पाटील यांची निवड करण्यात आली आहे.

दोन महिन्यापूर्वी उपसरपंच किशोर मधुकर महाजन यांचे दुदैवी निधन झाल्याने ही जागा रिक्त झाली होती. त्यानुसार आज ही निवड करण्यात आली. यासाठी सत्ताधारी गटाच्या आशाबाई कृष्णा पाटील तर विरोधी गटातील माजी सरपंच देविदास धांगो पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले दोघं अर्ज वैध झाल्याने दोघांनासारखी मते पडली. निवडणूक प्रक्रिया ही गुप्त पद्धतीने न होता हात वर करून घेण्यात आली. ग्राम पंचायत सभागृहात एकूण १२ सदस्य होते. दोघं उमेदवारांना सहा मते पडल्याने हा निर्णय ईश्वरचिठ्ठीने घेण्यात आला.

ईश्वर चिट्ठी काढण्यासाठी चार वर्षीय चिमुकली यशस्वी धोंडू पाटील हिच्या हस्ते ईश्वर चिट्ठी काढण्यात आली. यात देविदास पाटील यांचे नावाची चिट्ठी निघाली त्यामुळे ते विजयी झाले. असे निवडणूक निर्णय अधिकारी अजय  अडकमोल यांनी जाहीर केले.

सध्या दहीगाव ग्रामपंचायत वर काँग्रेस राज आहे. काँग्रेसचे बहुमत असतानादेखील भाजपाचे देविदास पाटील हे ईश्वरचिठ्ठीने विजयी झाले आहे. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुरेश देवराम पाटील, पुंडलिक राजाराम पाटील, रंजनाबाई विजय पाटील, सत्तार सुभान तडवी, हेमलता चेतन महाजन, वंदना गुलाब चौधरी, पल्लवी गौरव महाजन, मुमताजबी कमल खान, जयश्री अनिल बढे असे सर्व बारा ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.                                उपसरपंच निवड होतात शैलेंद्र पाटील, मयूर पाटील, अतुल भालेराव, वसंत पाटील, वेडू पाटील, दिनेश पाटील, विकास सोसायटी व्हाईस चेअरमन दिनेश पाटील आदींनी त्यांचे स्वागत केले. दरम्यान या उपसरपंच निवडणुकीत काँग्रेसचा एक फुटीरवादी सदस्य भाजपाचे उपसरपंचपदाचे उमेदवार पाटील यांच्या गटाला जावून मिळाल्याने यात कॉंग्रेसच्या हातातून उपसरपंचपदाची जागा गेल्याची खंत सरपंच अजय भालेराव यांनी व्यक्त केली.

Exit mobile version