काँग्रेसची शहरात सायकल रॅली

 

जळगाव : प्रतिनिधी । इंधन दरवाढ आणि महागाईविरोधात  जनमताचा दबाव मोदी सरकारच्या विरोधात वाढावा म्हणून आज काँग्रेस पक्षाने शहरात सायकल रॅलीचे आयोजन केले होते .

 

पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडवून सामान्यांनादेखील आर्थिक संकटात मोदी सरकारने टाकले आहे. केंद्र शासनाच्या चुकीमुळेच कोर्टाने ओबीसीचे राजकीय आरक्षण रद्द केले आहे ,केंद्र शासनाच्या या जनताविरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी आज काँग्रेस पक्षाच्या वतीने सायकल रॅली प्रदेश उपाध्यक्ष तथा आमदार शिरीष चौधरी, जिल्हाध्यक्ष संदीप पाटील यांच्या नेतृत्वात काढण्यात आली.

 

या रॅलीमध्ये  माजी खासदार डॉ. उल्हास पाटील  दिलीप पाटील , उदय पाटील, प्रभाकर सोनवणे, भगतसिंग पाटील,  शाम तायडे, प्रदीप पवार, राजीव पाटील, बाबा देशमुख, पाटील, प्रदीप सोनवणे, दीपक सोनवणे, जगदीश गाढे, मुजीब पटेल, अमजद पठाण, आदी सहभागी  होते.

 

कॉंग्रस भवन  आवारामधून या रॅलीला सुरुवात करण्यात आली व जिल्हाधिकारी कार्यालयावर या रॅलीचा समारोप करण्यात आला. या वेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. एकीकडे लोकांच्या हाताला काम नाही तर दुसरीकडे प्रचंड महागाई, या दुष्टचक्रात सर्वसामान्यांबरोबरच मध्यमवर्गही भरडला जात आहे , असा संताप या रॅलीमध्ये सहभागी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केला .

 

Protected Content