Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठाच्या परिक्षांना सुरूवात; चार दिवसात लागणार निकाल

जळगाव प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या उन्हाळी ऑनलाईन परीक्षांना सुरळीत प्रारंभ झाला असून परीक्षा झालेल्या काही विषयांचे निकाल केवळ तीन ते चार दिवसात जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. निकाल जाहीर करण्यातही विद्यापीठ आघाडीवर आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी देखील ऑनलाईन परीक्षा घेतल्या जात आहेत. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपात या परीक्षा होत असून कोणताही तांत्रिक व्यत्यय न येता या परीक्षा सुरळीत सुरु आहेत. प्रभारी कुलगुरु प्रा.ई.वायुनंदन व प्रभारी प्र-कुलगुरु प्रा.बी.व्ही.पवार यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षांचे काटेकोर नियोजन करण्यात आले आहे. ८ जून पासून प्रथम, व्दितीय व तृतीय वर्ष बी.एस.डब्ल्यू., बी.पी.ई., बी.ए.एम.सी.जे.च्या प्रथम व व्दितीय वर्ष तसेच डी.पी.ए., बी.ए. ॲडीशनल म्युझिक, बी.एफ.ए. च्या परीक्षा घेण्यात आल्या. १५ जून पासून बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी.च्या प्रथम, व्दितीय व तृतीय वर्षाच्या परीक्षा सुरु pझाल्या. २५ जून पासून एम.ए., एम.कॉम, एम.एस्सी., एम.एस.डब्ल्यू., एम.सी.ए., शिक्षणशास्त्र आणि पदवी व्यवस्थापनशास्त्रच्या परीक्षा सुरु झाल्या आहेत. २९ जून पासून व्यवस्थापनशास्त्रच्या पदव्युत्तर परीक्षांना प्रारंभ होत आहे. ८ ते २३ जून दरम्यान झालेल्या परीक्षेसाठी ७५९९२ विद्यार्थी प्रविष्ठ होते. अद्यापपावेतो डी.पी.ए., बी.पी.ई., बी.ए.एम.सी.जे., बी.ए. ॲडीशनल म्युझिक यापरीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आलेले असून सदर निकाल संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक श्री.बी.पी.पाटील यांनी दिली आहे.

Exit mobile version