Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठात विविध विषयांवर ऑनलाईन कार्यशाळा

जळगाव प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्यावतीने जळगाव,धुळे व नंदूरबार जिल्हयातील विद्यापीठ परीक्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा, व्यक्तीमत्व विकास व संवाद कौशल्य या विषयावर ऑनलाईन कार्यशाळेचे १७ ते २० ऑगस्ट,२०२० या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे.

कोरोना विषाणूमुळे शैक्षणिक संस्था बंद असल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत रोजगार मिळविण्याच्या संधी कमी झाल्या असून त्यांच्यात नैराश्य, रोजगाराचे साधन याबाबत भविष्याविषयी चिंता निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन विद्यार्थी व प्राध्यापकांसाठी १७ रोजी ‘स्वयंदिप बनू या’ या विषयावर यजुर्वेद महाजन, १९ रोजी ‘कोरोना काळ व भविष्यातील रोजगाराच्या वाटा’ या विषयावर प्रा.सुरेश पांडे व दि.२० रोजी ‘कोरोना काळ व ताणतणाव व्यवस्थापन’ या विषयावर प्रा.विवेक काटदरे यांचे ऑनलाईन व्याख्यान दुपारी ४ ते ५.३० या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. ऑनलाईन व्याख्यानासाठी Zoom Cloud Meeting ID- 92450088487 Password- 528123 असून विद्यार्थी व प्राध्यापकांनी अधिक संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन या विभागाचे प्रभारी संचालक प्रा.मनिष जोशी यांनी केले आहे.

Exit mobile version