Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कळमसरेत आजपासून संगीतमय शिवपुराण कथेला प्रारंभ 

अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | कळमसरे ता. अमळनेर येथील दत्त मंदिर चौकातील श्री दत्त मंदिराच्या जयंती निमित्ताने सालाबादाप्रमाणे यावर्षीही गुरुदत्त मंदिराच्या ट्रस्टी यांनी संगीतमय शिवपुराण कथा व निरूपण गुरुचरित्र सह अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन केले आहे.

आज 1 डिसेंबर पासून या कथेला व हरीनाम सप्ताहाला सुरुवात होत असून कार्यक्रमाची सात दिवस मोठ्या उत्साहात दत्त जयंती साजरा केली जाते.

यावेळी प. पू. कृष्णदास महाराज, नांदेड यांची शिवपुराण कथा निरूपण दररोज दुपारी 2 ते 5 वाजता दररोज सायंकाळी 6 ते 7 वाजता हरिपाठ रात्री 8.30 ते 10.30 वाजता हरिकीर्तन संकीर्तन राहील. उद्या ता.1 रोजी सकाळी 9 वाजता ग्रंथ दिंडी व शोभा यात्राने कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे.

यात दररोज रात्री 8.30 वाजता ते 10.30 वाजता ता.1 रोजी ह. भ. प. अरुण महाराज,जामठीकर ता.2 रोजी ह. भ. प. जनार्दन महाराज आरावेकर,ता.3 रोजी ह. भ. प. जितेश महाराज म्हसावदकर , ता.4 रोजी ह. भ. प. भावेश महाराज विटनेर,ता.5 रोजी ह. भ. प.गोविंद महाराज वरसाडेकर ता.6 रोजी ह. भ. प. श्रवण महाराज कुकाणेकर, ता.7 रोजी ह. भ. प. अतुल महाराज नारणेकर ता.8 रोजी ह. भ. प. पांडुरंग महाराज आवरकर यांचे सकाळी 9 ते 11 काल्याचे कीर्तन होईल. ता.8 रोजी दुपारी महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. कळमसरे सह परिसरातील भाविकानी याप्रसंगी कथा श्रवण व कीर्तनाचा लाभ घ्यावा असे आवाहन गुरुदत्त मंदिराचे ट्रस्टी यांनी केले आहे.

Exit mobile version