कळमसरा येथे ग्रामस्वच्छता अभियानात युवकांचे श्रमदान

 

पाचोरा, प्रतिनिधी । तालुक्यातील कळमसरा येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी महिला आघाडीच्या प्रदेश सचिव वंदना अशोक चौधरी व ग्रामस्थांतर्फे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्वच्छता मोहीम राबवून जनजागृती करण्यात आली. यात ग्रामस्थांनी गावातील रस्त्यांची साफसफाई केली. तर महिलांच्या शौचालयांची देखील स्वच्छता करण्यात आली.

राजनंदिनी बहुउद्देशिय संस्थेतर्फे वंदना चौधरी यांच्या सामाजिक कार्याची दखल घेवून त्यांचा सत्कार श्रीराम मंदिरात करण्यात आला. निसर्गप्रेमी आणि गंगा नर्सरीचे संचालक दत्तात्रय तावडे यांना “पर्यावरण मित्र पुरस्कार २०२० – २१” देवून सन्मानित केले. यावेळी दहावीच्या परीक्षेमधील गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थिनी आणि सैन्यात रुजू झालेल्या जवानांचा सुद्धा सत्कार करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यात योगदान लाभलेल्या व्यक्तींना “कोरोना योद्धा” पुरस्कार देवून सन्मानित केले.

सामाजिक कार्यकर्ते रवींद्र सावंत, शिवाजी देशमुख, शिवाजी घुले, रमेश तेली, प्रकाश देशमुख, संतोष बोखारे, दिलीप पाटील आदींचा गौरव करण्यात आला. राजनंदिनी बहुउद्देशिय संस्थेच्या सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य विषयक विविध कार्यक्रम, उपक्रमांची माहिती संस्थेचे उपाध्यक्ष युवराज वामने पाटील, संचालक योगेश वाघ यांनी दिली. यास्तुत्य उपक्रमांचे कौतुक वंदना चौधरी, शेंदुर्णी जिनिंगचे संचालक अशोक चौधरी यांनी केले. गौरी उद्योग समूह आणि महाराष्ट्र खान्देश कुणबी पाटील वधू – वर सूचक केंद्राचे संचालक सुमित पाटील यांचाही सत्कार झाला. सोशल मीडियात सक्रीय सहभागाबद्दल पी. आर. वाघ यांना सन्मानित करण्यात आले. सूत्रसंचालन ज्ञानेश्वर वाघ यांनी केले. आभार उपसरपंच कैलास चौधरी यांनी मानले.

Protected Content